
Maharashtra Politics : महाविकास आघाडीला गळती? मविआतील 20 ते 22 आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच राजकीय नेत्यांचे इतर पक्षात होणाऱ्या प्रवेशाची संख्याही वाढली आहे. तर आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी काल केलं आहे.
तर महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. माढा तालुक्यातील टेंभूर्णीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
तर प्रसार माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी. यापुढं येणार महापालिकेचं मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असा विश्वासदेखील उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
बच्चू कडू यांचा दावा-
बच्चू कडू यांच्या संपर्कात महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
तर बच्चू कडू यांच्या या दाव्याला शिंदे गटाचे मंत्री शहाजीबापू पाटील यांनी दुजोरा दिला आहे. तर म्हणाले की, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटू शकतात.