Big Breaking : शिवसेना उद्या न्यायालयात जाणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करु न शकल्याने पक्षाकडून वाढीव मुदत मागण्यात आली होती. परंतु, ती मुदत राज्यपालांकडून नाकारण्यात आली असून या निर्णयाच्या विरोधातच शिवसेना न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करु न शकल्याने पक्षाकडून वाढीव मुदत मागण्यात आली होती. परंतु, ती मुदत राज्यपालांकडून नाकारण्यात आली असून या निर्णयाच्या विरोधातच शिवसेना न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन न करु शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. पुढच्या 24 तासांत पुरेसं संख्याबळ दाखवून सत्तास्थापन करण्याची इच्छा व्यक्त करणं आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. शिवसेनेनं तीन दिवसांची मुदत मागितली होती. पण, ती राज्यपालांनी दिली नाही.

राजकीय नाट्याला वेग आला असतानाच काँग्रेसने मात्र शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिला नाही. काँग्रेसची ही भूमिका शिवसेनेला आणि सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली. त्यानंतर मात्र, राज्यपालांनी थेट तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Breaking: Shiv Sena may go court tomorrow