मोठी ब्रेकिंग! अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर; ‘या’ ७ तालुक्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असून सीना नदीला महापूर आल्याने अनेक गावांचे रस्ते बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ या संपूर्ण तालुक्यासह मंद्रूप अप्पर तहसील (ता. दक्षिण सोलापूर) कार्यालय परिसर, उत्तर सोलापूरचा ग्रामीण भाग, अक्कलकोटमधील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असून सीना नदीला महापूर आल्याने अनेक गावांचे रस्ते बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ या संपूर्ण तालुक्यासह मंद्रूप अप्पर तहसील (ता. दक्षिण सोलापूर) कार्यालय परिसर, उत्तर सोलापूरचा ग्रामीण भाग, अक्कलकोटमधील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सीना नदीला महापूर आल्याने माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह करमाळा व अक्कलकोट तालुक्यातील काही भागाला मोठा फटका बसला आहे. या तालुक्यांमधील १०० हून अधिक गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. माढा तालुक्यातील लव्हे येथील डगवर वस्ती परिसरातील अडकलेल्या १०० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी त्याठिकाणी रात्री उशिरा एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते.

दुसरीकडे करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठावरील खडकी, कोमणे, आळजापूर, बिटरगाव श्री, निलज, संगोबा, पोटेगाव या गांवानाही पुराने वेढले आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातही अशीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. त्यात दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या आहेत.

मुख्याध्यापक अधिकारात घ्यावी लागणार सुट्टी

प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनीही गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करीत पूरस्थिती उद्‌भवलेल्या तालुक्यांमधील शाळांना मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार उद्या (मंगळवारी) पूरस्थिती निर्माण झालेल्या गावांमधील जिल्हा परिषदेसह सर्व शाळांना सुट्टी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com