esakal | मोठा निर्णय! वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्य सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वयोमर्यादेत ६० वरुन ६२ वयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी मान्यता देण्यात आली. (Big decision of state cabinet Increase in retirement age of medical officers aau85)

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, "राज्यात आता आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे ६२ वर्षे हे कटऑफ वय असणार आहे. जे वैद्यकीय अधिकाऱ्या एका वर्षानंतर निवृत्त होणार होते. त्यांना कोविडच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी एक्सटेंशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल सर्जन्स, मेडिकल सुपरिटेंडंट आणि वैद्यकीय अधिकारी असोत सर्वांसाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे."

तीन-चार दिवसांत आणखी एक जाहिरात निघणार

"मोठ्या प्राणावर आता आपण डॉक्टर्सच्या रिक्त जागा भरत आहोत. गेल्या आठ दिवसात पहिल्या टप्प्यात ८९९ जागा भरण्यात आल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसांनंतर आणखी एक डॉक्टरांच्या भरतीसाठीची जाहिरात काढण्यात येणार आहे. यामध्ये पुन्हा १००० मेडिकल ऑफिसर्सची भरती केली जाणार आहे. यामध्ये एमबीबीएस आणि स्पेशालिस्ट या सर्वांचा अंतर्भाव असणार आहे. त्यामुळे सध्या सर्व रिक्त जागा भरण्याचं महत्वाचं काम आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे," असंही टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

स्थगिती दिलेल्या भरतीवरही झाला निर्णय

यापूर्वी 'क' आणि 'ड' गटामध्ये जी भरती झालेली होती. त्यामध्ये नर्सेस आणि ड्रायव्हर्सची भरती करण्यात आली होती. स्थगिती दिलेल्या भरतीवर देखील आता निर्णय झाला आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

loading image