विद्यापीठाचा मोठा निर्णय! दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर आता विद्यापीठाच्या परीक्षेतही सीसीटीव्ही कॅमेरे; रेकॉर्डिंग देण्याचे महाविद्यालयांना बंधनकारक

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांवेळी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतात; मात्र विद्यापीठाच्या परीक्षांसाठी ही अट नव्हती. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत.
CET exam

univercity exam

sakal 

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २ एप्रिलपासून (गुरुवार) सुरू होत आहे. परीक्षा पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली पार पडणार आहे. आज (सोमवार) परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांतील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचा अहवाल प्राचार्यांनी विद्यापीठास सादर केला. त्यानंतरच विद्यापीठाने परीक्षार्थ्यांचे हॉलतिकीट वितरित केले.

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांवेळी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतात; मात्र विद्यापीठाच्या परीक्षांसाठी ही अट नव्हती. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. यासाठी महाविद्यालयांकडून अहवाल मागविण्यात आला होता. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हॉलतिकीट वितरित करण्यात आले.

प्रत्येक महाविद्यालयातील सीसीटीव्हीच्या ‘डीव्हीआर’चे आयपी ॲड्रेस विद्यापीठाने घेतले असून, निकाल लागेपर्यंत संबंधित रेकॉर्डिंग जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्याची कारणे ग्राह्य धरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे सीसीटीव्ही विद्यापीठाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असून, तेथून परीक्षेवर थेट नजर ठेवता येणार आहे.

तिसऱ्या वर्षाची परीक्षा पुढे ढकलली

‘एलएलबी’ची सीईटी (प्रवेश परीक्षा) १ व २ एप्रिल रोजी होणार आहे. ‘बी.पी.एड.’ची सीईटी ४ एप्रिलला, ‘एमबीए’ची सीईटी ६ ते ८ एप्रिलदरम्यान, तर ‘बी.एड.’ व ‘एम.एड.’ची सीईटी ९ एप्रिलला होईल. सध्या तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी या परीक्षा देत असल्याने त्यांच्या पाचव्या व सहाव्या सत्रांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २ ते ९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या परीक्षा नंतर घेतल्या जाणार आहेत.

परीक्षेचे नियोजन अंतिम

प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यानुसार महाविद्यालयांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. परीक्षा सुरू असताना किंवा नंतर विद्यापीठाच्या मागणीनुसार संबंधित वर्गांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग देणे महाविद्यालयांना बंधनकारक राहील, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. २ एप्रिलपासून पदवी, १६ एप्रिलपासून पदव्युत्तर आणि ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होतील.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

परीक्षेसंदर्भातील सद्य:स्थिती

  • एकूण परीक्षा केंद्रे : १०९

  • एकूण अभ्यासक्रम : १०१

  • परीक्षार्थी विद्यार्थी : ७०,०००

  • परीक्षा सत्रे : ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com