मोठी बातमी! सोलापुरातील १५ ऑर्केस्ट्रा बार अन् १४ कला केंद्रांना लागणार कायमचे कुलूप; सोलापूर पोलिसांनी मागवली माहिती; गृह विभागाचा नेमका आदेश काय? वाचा...

सोलापूर शहरात सहा तर ग्रामीणमध्ये नऊ ऑर्केस्ट्रा बार आहेत. यातील ग्रामीणमधील आठ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करावेत, म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. आता गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार शहर-जिल्ह्यातील सगळेच ऑर्केस्ट्रा बार बंद होणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील १४ (सर्वच) कला केंद्रांचेही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
solapur

ऑर्केस्ट्रा बार

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात सहा तर ग्रामीणमध्ये नऊ ऑर्केस्ट्रा बार आहेत. यातील ग्रामीणमधील आठ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करावेत, म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. आता गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार शहर-जिल्ह्यातील सगळेच ऑर्केस्ट्रा बार बंद होणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील १४ (सर्वच) कला केंद्रांचेही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

ऑर्केस्ट्रा बारसाठी परवाने घेतले जातात, पण प्रत्यक्षात त्याठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर बसविले जातात. त्याठिकाणी अश्लील, बीभत्स नृत्य केले जाते, तरुण नृत्यांगनांशी लगट करण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी वेश्याव्यवसायदेखील चालतो. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने ऑर्केस्ट्रा बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मंत्रिमंडळात निर्णय झाला, अधिवेशनात विधेयक पारित होऊन त्यास राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार असून पोलिस अधिकाऱ्यांनी कोणाचा परवाना कधी संपतो, याची माहिती मागविली आहे.

मुदतीनंतर ऑर्केस्ट्रा बार बंद करावे लागतील

गृह विभागाच्या आदेशानुसार आता नवीन ऑर्केस्ट्रा बारसाठी परवानगी मिळणार नाही. दुसरीकडे ज्या ऑर्केस्ट्रा बारची मुदत संपेल, त्यांचे नूतनीकरणदेखील यापुढे केले जाणार नाही. मुदत संपेपर्यंत सध्या सुरू असलेले ऑर्केस्ट्रा बार सुरू राहतील. पण मुदतीनंतर संबंधितांना ऑर्केस्ट्रा बार बंद करावे लागतील.

- विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

गृह विभागाचा नेमका आदेश काय?

सध्या प्रत्यक्ष संगीत सादरीकरण (ऑर्केस्ट्रा) परवाना हा महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ नुसार नेमलेल्या सार्वजनिक मनोरंजन नियमावलीतील तरतुदीनुसार दिला जातो. मात्र, निर्बंध टाळण्यासाठी तसेच त्यास पळवाट म्हणून प्रत्यक्ष संगीत सादरीकरण परवान्यांचा पर्यायी स्वरूपात वापर केला जात असल्याची बाब निदर्शनास आली. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष संगीत सादरीकरण आस्थापना, महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्षांमधील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत (तेथे काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ अंतर्गत आणला आहे. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष संगीत सादरीकरणाचे (ऑर्केस्ट्रा) परवाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत न देता तेथील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत व तेथे काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासंदर्भात अधिनियम २०१६ अंतर्गत देण्याबाबतची सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव व त्याअनुषंगाने विधिमंडळास विधेयक करण्यास २ जुलैला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार विधेयक पावसाळी अधिवेशनात संमत झाले आणि त्यास राज्यपालांची संमती मिळाली आहे. त्यानुसार यापुढे नव्याने ऑर्केस्ट्रा बार परवाने मंजूर करू नयेत, यापूर्वी मंजूर ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे आदेश काढण्यात आले आहेत.

सोलापूरातील स्थिती

  • ग्रामीणमधील ऑर्केस्ट्रा बार

  • शहरातील ऑर्केस्ट्रा बार

  • कला केंद्रे

  • १४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
advocate
solapur city police comissioner m raj kumar
 Inspector of Police
Marathi News Esakal
www.esakal.com