मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत १५ अनधिकृत शाळा; फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; पालकांना केले ‘हे’ आवाहन

सोलापूर शहरात आठ, दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन, पंढरपुरात एक आणि सांगोल्यात चार, अशा १५ शाळा अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. या शाळांना दंड आकारून त्या तातडीने बंद करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले आहेत.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात आठ, दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन, पंढरपुरात एक आणि सांगोल्यात चार, अशा १५ शाळा अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. या शाळांना दंड आकारून त्या तातडीने बंद करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जुलै २०२५ पासून ६ एप्रिल २०२६ या कालावधीत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १० वेळा संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. तरीदेखील, या अधिकाऱ्यांनी त्या शाळांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता त्या अधिकाऱ्यांनी या शाळांवर कारवाई न केल्यास त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. तसेच या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस तुम्हालाही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

‘या’ आहेत अनधिकृत शाळा

  • सोलापूर शहरातील शाळा : नोबल विस्डम प्रि प्रायमरी स्कूल, बारा इमाम चौक, ट्विंकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत ट्विंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, चंद्रलोक नगर (जुळे सोलापूर), नारायण इ टेक्नो स्कूल, सोलापूर, विष्णूपंत कोळे मेमोरिअल इंग्लिश मिडीयम स्कूल, इकरा इस्लामिक स्कूल ॲंड मक्तब स्कूल, लोकमान्य नगर, श्री चैतन्य टेक्नो स्कूल, अंत्रोळीकर नगर, आर्यन वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल, बॉम्बे पार्क, इगल एज्युकेशन सोसायटी संचलित सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, नई जिंदगी (कुंभारी रोड).

  • दक्षिण सोलापूर : एशियन इनिव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल, वळसंग आणि नाकेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव).

  • पंढरपूर : फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पंढरपूर

  • सांगोला : हनुमान इंग्लिश मिडीयम स्कूल (कटफळ), सांगोला गुरुकूल, बाळूमामा गुरुकूल आणि विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, मेडशिंगी

...तर फौजदारी कारवाई केली जाणार

सोलापूर जिल्ह्यातील १५ खासगी स्वयंअर्थसहाय्यिता अनधिकृत शाळांवर कार्यवाही करुन त्या बंद करण्याची कार्यवाही करावी. आदेशासोबत शाळांची यादीही जोडली आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश देऊन शाळा सुरु केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. पालकांनीही अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊन आपल्या पाल्यांचे नुकसान करु नये.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com