

solapur news
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या सोलापुरातील ६८ लिंगांचा जिर्णोद्धार केला जाणार आहे. १२ व्या शतकातील या लिंगांचा पहिल्यांदाच जिर्णोद्धार होणार आहे. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात सहा कोटी ८० लाख रुपयांचा निधी मागितला होता. या कामासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सुरवातीला चार लिंगांच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले जाणार आहे.