

सोलापूर : इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पुढील चार वर्षांत पदवी व बीएड (इंटिग्रेटेड कोर्स) अशा दोन पदव्या घेता येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यासंदर्भातील प्रस्ताव नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे (एनसीटीई) पाठविला आहे. त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरवात करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सध्या विद्यापीठासह संलग्नित सर्वच उच्च महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी लागू करण्यात आले आहे. पण, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तूर्तास हे धोरण लागू झालेले नाही. तत्पूर्वी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आम्ही आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स (बीए-बीएड, बीकॉम-बीएड, बीएस्सी-बीएड) सुरू करण्यास तयार असल्यासंदर्भातील प्रस्ताव २०२४ मध्ये ‘एनसीटीई’ला पाठविला आहे. त्यात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणाबरोबरच बीएडचेही शिक्षण मिळणार आहे. चार वर्षानंतर विद्यार्थी दोन्ही पदव्या घेऊन बाहेर पडणार आहे. सध्या पदवीसाठी तीन वर्षे आणि बीएडसाठी दोन वर्षे, असे पाच वर्षे घालवावी लागतात.
पहिल्यांदा विद्यापीठात अंमलबजावणी; ३०० विद्यार्थ्यांना करता येईल बीएड
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्याचा २०२४ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. बारावीनंतर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बीए-बीएड, बीकॉम-बीएड, बीएस्सी-बीएड अशा दोन पदव्या चार वर्षात पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्याची प्रवेश क्षमता प्रत्येकी १०० असणार आहे. कला शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीए-बीएड, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यास बीकॉम-बीएड आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बीएस्सी-बीएड करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या बीएड महाविद्यालयांना २०२९ पर्यंत नवीन धोरणानुसार स्वत:मध्ये बदल करून घ्यायचा आहे.
‘एनसीटीई’कडे प्रस्ताव पाठवून मागितली मान्यता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने २०२४ मध्ये विद्यापीठात बारावीनंतर विद्यार्थ्यांना बीएड करता यावा, यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव ‘एनसीटीई’ला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चार वर्षांत पदवीसोबतच बीएड देखील करता येईल. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास आहे.
- डॉ. राजशेखर हिरेमठ, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा, विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.