मोठी बातमी! मुलगा अन्‌ सूनेविरूद्ध डॉ. उमा वळसंगकरांची न्यायालयात धाव; हॉस्पिटलमध्ये बेकायदा घुसखोरीची दिवाणी न्यायालयात तक्रार, १६ जुलैला सुनावणी, वाचा...

रेल्वे लाईन्स परिसरातील नामांकित ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपीच्या जागेचा आणि मालकी हक्काचा कौटुंबिक व व्यावसायिक वाद आता दिवाणी न्यायालयात पोचला आहे. हॉस्पिटलच्या भागीदार डॉ. उमा शिरीष वळसंगकर यांनी मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली, सूनेचे वडील डॉ. दिलीप जोशी व आई रिता जोशी यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात ‘निरंतर ताकीदीसाठी’ (कायमस्वरूपी मनाईहुकूम मिळणेबाबत) दावा दाखल केला आहे. त्यावर आज (गुरुवारी) सुनावणी होती. आता १६ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
Accused Manisha being brought to court in connection with the Dr. Shirish Valsangkar case

Accused Manisha being brought to court in connection with the Dr. Shirish Valsangkar case

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : रेल्वे लाईन्स परिसरातील नामांकित ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपीच्या जागेचा आणि मालकी हक्काचा कौटुंबिक व व्यावसायिक वाद आता दिवाणी न्यायालयात पोचला आहे. हॉस्पिटलच्या भागीदार डॉ. उमा शिरीष वळसंगकर यांनी मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली, सूनेचे वडील डॉ. दिलीप जोशी व आई रिता जोशी यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात ‘निरंतर ताकीदीसाठी’ (कायमस्वरूपी मनाईहुकूम मिळणेबाबत) दावा दाखल केला आहे. त्यावर आज (गुरुवारी) सुनावणी होती. आता १६ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयात दाखल दाव्यानुसार ईरण्णा वस्तीतील (रामवाडी) ५५,००० चौरस फुटाची व्यापारी इमारत माझ्या व दिवंगत पती डॉ. शिरीष यांच्या संयुक्त मालकीची होती. डॉ. शिरीष यांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या निधनानंतर पत्नी म्हणून मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला. सध्या तेथे एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भाडेपट्ट्याने चालवले जाते. ज्यात डॉ. उमा वळसंगकरांसह मुलगी नेहा फडके व जावई डॉ. सुजय फडके भागीदार आहेत. यात प्रतिवादी डॉ. शोनाली, डॉ. दिलीप जोशी यांचा हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नाही. तरी, त्यांनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टर्स, कर्मचारी, भागिदारांच्या आराम व निवासाच्या ठिकाणी बेकायदा प्रवेश केला. तिथे आरडाओरडा करून, असभ्य भाषा वापरून रुग्णालय व्यवस्थापनात अडथळा आणला.

‘आम्ही आमची ओपीडी येथे सुरूच करणार’ अशी धमकी माझ्यासह कर्मचाऱ्यांना दिली. डॉ. शोनाली व इतरांकडून मालमत्तेच्या शांततामय उपभोगात आणि हॉस्पिटलच्या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना रुग्णालयाच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश करण्यास आणि अडथळा आणण्यास कायमची मनाई (ताकीद) करावी, अशी विनंती या दाव्याद्वारे डॉ. उमा यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयीन प्रक्रियेनुसार होणार आहे.

अर्जातील ठळक मुद्दे...

  • (१) मुलगा डॉ. अश्विन व सून डॉ. शोनाली मे २०२५ पासून वेगळे राहतात. डॉ. शोनाली वडिलांकडे राहते, तिने इतरत्र डॉक्टरकीचा व्यवसायही सुरू केला आहे. ती कधीही हॉस्पिटलचा भाग नव्हती. हॉस्पिटलमध्ये कधीही डॉक्टर, स्टाफ नव्हत्या. त्यामुळे ‘एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी’शी त्यांचा कोणताही संबंध नाही.

  • (२) १८ जून २०२६ रोजी डॉ. शोनालीने पूर्वपरवानगीशिवाय रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवासस्थानात बेकायदा घुसखोरी केली. २७ जूनला मी तेथील साहित्य, भांडी आणायला गेल्यावर डॉ. शोनालीने दरवाजा उघडला नाही. दुसऱ्या दरवाजातून आत जाताना उद्धट वर्तन करून खोलीत येण्यास मज्जाव केला. त्यातून ज्येष्ठ नागरिक म्हणून मला मानसिक त्रास व यातना झाल्या.

  • (३) डॉ. शोनालीच्या आई-वडिलांनीही अरेरावीची भाषा वापरून त्याठिकाणी ओपीडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना निरंतर ताकीद द्यावी. माझ्या कब्जातील मालकीच्या जागेच्या वहिवाटीस ते यापुढेही अडथळा करण्याची दाट शक्यता आहे.

  • (४) दाव्यातील डॉ. अश्विन वळसंगकर हा नाममात्र पक्षकार म्हणून समाविष्ट केले असून त्यांच्याविरुद्ध कोणतीही मागणी नाही. त्यांनी हल्लीचेकामी हजर व्हावे अगर कसे, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांच्या खर्चासाठी मी जबाबदार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr. Valsangkar suicide case
Dr. Valsangkar’s suicide case
निदा खानच्या जामीनावर आज सुनावणी
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com