

solapur
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : अपघात कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये सुधारणा केली आहे. १ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यानुसार आता एका वर्षात एकाच वाहनावर वाहतूक नियम मोडल्याची पाचवेळा कारवाई झाल्यास त्यावर कठोर कारवाई होणार आहे. अशा वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र, बॅंकेतून लोन, परमीट, एनओसी मिळणार नाही. त्याचे वाहनाचे नूतनीकरण व हस्तांतरण देखील करता येणार नाही.
वाहतूक नियम मोडलेल्या वाहनधारकासह तीन दिवसांत इलेक्ट्रिक माध्यमाद्वारे तीन दिवसांत ई-चालान पोच होईल. त्यांनतर बेशिस्त वाहनधारकास त्या चालानवर आक्षेप घेण्यासाठी किंवा दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत असणार आहे. याशिवाय ३० दिवसांची अतिरिक्त देखील मुदत दिली जाईल. तरीपण, प्रलंबित दंड न भरल्यास ते वाहन परिवहन विभागाच्या पोर्टलवर ब्लॅकलिस्ट होईल. त्यामुळे त्या वाहनाचे लायसन्स किंवा नोंदणीचे काम थांबवणार आहे.
एका वर्षात (आर्थिक वर्ष) एकाच वाहनचालकाने पाचवेळा नियम मोडल्यास तो चालक वाहतुकीतील सराईत गुन्हेगार मानला जाणार आहे. नव्या नियमावलीनुसार त्या चालकावर कडक कारवाई होऊ शकते. दुसरीकडे ‘चालान’वरील आक्षेप संबंधित वाहतूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्यावर त्या वाहनधारकास न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. पण, त्यासाठी त्याला दंडाची ५० टक्के रक्कम आधी भरावी लागणार आहे.
'चालान'वर आक्षेपासाठी ४५ दिवस मुदत
आरटीओ, वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर ‘चालान’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकदा एखाद्याची गाडी त्याठिकाणी नसताना त्यांना दंडाचे चालान जाते. काहीवेळा वाहतूक नियम मोडला नसताना देखील दंड होतो. अशा वाहनचालकांना पुराव्यासहित ४५ दिवसांत ऑनलाइन किंवा संबंधित यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन हरकत नोंदवावी लागेल. मुदतीत हरकत न नोंदविल्यास तो दंड त्या वाहनधारकास भरावाच लागेल, असेही नियमावलीत नमूद आहे.
प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे
नवीन केंद्रीय मोटार वाहन नियम-२०२६ नुसार आता एकाच वाहनावर वर्षभरात पाचवेळा दंडात्मक कारवाई झाली असेल तर त्या वाहन चालकाचा परवाना रद्द होऊ शकतो. याशिवाय दंडाची रक्कम भरल्याशिवाय त्या वाहनाची विक्री, नूतनीकरण, हस्तांतरण, फिटनेस अशी कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- विजय पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.