मोठी बातमी! मार्कर पेनच्या शाईचे नमुने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत; झेडपी निवडणुकीत बाटलीतील शाई; सोलापुरात येणार मालेगावातून 4000 EVM, कर्मचाऱ्यांची ड्युटी रद्द नाहीच

सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली मार्कर पेनची शाई पुसत असल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शाईचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचे प्रमुख कारण अहवालातून समोर येईल. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाटलीतील शाई की मार्कर पेन वापरायचा यावर निर्णय होईल.
ZP Election Voting Ink

Election Voting Ink

ESakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन हजार ७५८ केंद्रे असणार आहेत. या निवडणुकीसाठी साडेसात हजार बॅलेट युनिट (बीयू) आणि तीन हजार ३६६ कंट्रोल युनिट (सीयू) लागणार आहेत. महापालिकेत वापरलेले ३६०० बीयू आणि १५०० सीयू जिल्हा परिषदेसाठी मिळतील. परंतु, मशीनमधील सततचे बिघाड, बटण न दाबण्याच्या तक्रारींमुळे नाशिकच्या मालेगावातून देखील चार हजार बॅलेट युनिट व १७०० कंट्रोल युनिट सोलापुरात येणार आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ लाख ७७ हजार ६१ पुरूष आणि ११ लाख ८२ हजार ८३ महिला व इतर ८३ मतदार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीला संपणार आहे. २७ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. तरीदेखील, महाविकास आघाडीतील काँग्रेस, उबाठा शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एकत्र लढणार की स्वबळावर, याचा निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भाजप स्वबळावरच लढेल, अशी चर्चा आहे.

आतापर्यंत भाजपला स्वत:च्या चिन्हावरील जिल्हा परिषद अध्यक्ष करता आलेला नाही. नगरपालिका, महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वत:चा करण्यसाठी गटनिहाय प्लॉनिंग सुरु केले आहे. भाजपसमोर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे प्रमुख आव्हान असणार आहे.

पहिले प्रशिक्षण पाच-सहा दिवसांत

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुबलक ‘ईव्हीएम’ उपलब्ध आहेत. मशीन कमी पडू नयेत म्हणून मालेगावातूनही ‘ईव्हीएम’ येणार आहेत. या निवडणुकीसाठी १५ हजार २०० कर्मचारी असणार आहेत. त्यांचे पहिले प्रशिक्षण पाच-सहा दिवसांत होईल.

- संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

निवडणुकीसाठी १५,२०० कर्मचारी; कागदपत्रांशिवाय ड्युटी रद्द नाहीच

जिल्हा परिषदेच्या ६८ जागा आणि ११ पंचायत समितीच्या १३६ सदस्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १५ हजार २०० कर्मचारी लागणार आहेत. त्या सर्वांना आता इलेक्शन ड्युटीचे आदेश देण्यात येत आहेत. निवडणुकीची ड्युटी अत्यावश्यक कारणांशिवाय रद्द होणार नाही. त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. वशिलेबाजी चालणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बोटाला आता बाटलीतील शाई

सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावलेली मार्कर पेनची शाई पुसत असल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शाईचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचे प्रमुख कारण अहवालातून समोर येईल. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाटलीतील शाई की मार्कर पेन वापरायचा यावर निर्णय होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com