मोठी बातमी! १० हजार पोलिसांची भरती १५ सप्टेंबरपासून; उन्हाळा, पावसाळ्यामुळे भरती लांबली; एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र

गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
solapur
police bharatisakal news
Updated on

सोलापूर (तात्या लांडगे) : गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी दिली. २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण १० हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com