

Maharashtra Extends 50% Property & Water Tax Relief
esakal
Maharashtra Government Resolution : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज (ता.३१) ला जारी करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के मिळणारी सवलत आणखी वाढणार असल्याने सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.