Nilesh Lanke: राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना मोठा दिलासा; 'त्या' प्रकरणातून झाली निर्दोष मुक्तता

Nilesh Lanke
Nilesh Lankeesakal

अहमदनगर: जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणीयोजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलिस कर्मचाऱ्यास जखमी केल्याप्रकरणी २००७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह २० कार्यकर्त्यांची अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी निर्दोष मुक्तता केली.

Nilesh Lanke
Sharad Pawar Resigns : 'अजित पवार घोटाळेबाज, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं'; माजी आमदार शालिनीताई पाटील यांचं मोठं वक्तव्य

विधानसभेच्या सन २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार (कै.) वसंतराव झावरे यांचा पराभव करून शिवसेनेचे विजय औटी आमदार झाले होते. तत्कालीन आमदार (कै.) वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तसेच पारनेर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस मंजुरी मिळून ती कामे सुरू झाली होती.

त्यावेळी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने, १८ ऑगस्ट २००७ रोजी दोन्ही कामांच्या लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे लोकार्पण करणार होते. आमदार विजय औटी यांना विश्‍वासात घेण्यात न आल्यामुळे त्यांनी पारनेर येथे उपोषण सुरू केले होते.

Nilesh Lanke
पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने प्रफुल्ल पटेलांना विचारला जाब

नीलेश लंके, लाला साठे व इतर २० जणांनी दुपारी १२ वाजता हंगे शिवारातील पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेवर दगडफेक करण्यास सुरवात केली. तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी दिलीप जमदाडे व इधाटे जखमी झाले होते.

जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शासकीय कामात अडथळा आणला, तसेच दगड मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांच्या जबाबामधील तफावत लक्षात घेता, पुरेशा पुराव्यांअभावी आमदार नीलेश लंके व इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

लंके यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश गुगळे, अ‍ॅड. युवराज पाटील, अ‍ॅड. राहुल झावरे, अ‍ॅड. स्नेहा झावरे, अ‍ॅड. गणेश दरेकर, अ‍ॅड. शिवदास शिर्के यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com