esakal | राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना मोठा धक्का, बच्चू कडूंच्या 'प्रहार'ची एंट्री!
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

अमोल मिटकरींना मोठा धक्का, बच्चू कडूंच्या 'प्रहार'ची एंट्री

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अकोला : राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) गाजलेल्या मुद्द्यानंतर आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमोल मिटकरींना मोठा धक्का, गावातच पराभव; 'प्रहार'ची जिल्हा परिषदेत एन्ट्री" राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लागलं आहे. जिल्हा (Akola ZP Election) परिषद व पंचायत समित्यांची पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. अमोल मिटकरींच्या गावात राष्ट्रवादीचा पराभव झाला असून, बच्चू कडूंच्या प्रहारचा दिमाखात विजय झाला आहे

जिल्हा (Akola ZP Election) परिषद व पंचायत समित्यांची पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांची कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. आमदार मिटकरी यांच्या कुटासा गावाच्या पोटनिवडणुकीत हात मिळवणी केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता. दरम्यान यासंदर्भात मिटकरी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली होती.

‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर

राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण बच्चू कडू ‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर आलाय. प्रहारला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे या मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरु झालीय. शिवाय बच्चू कडू यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते ठिकठिकाणी शाखा गठित करत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत ‘प्रहार’चं मिशन 12 ते 15 आमदार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी खास रणनीती देखील आखलीय.

loading image
go to top