पेन्शन योजनेबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट; महाजन म्हणाले, ही योजना.. I Girish Mahajan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Girish Mahajan

जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता करीत आहेत.

Girish Mahajan : पेन्शन योजनेबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट; महाजन म्हणाले, ही योजना..

राज्यातील निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला, तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme). अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे.

हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या बिगर भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. आता या जुन्या पेन्शन योजनेबाबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही मोठं वक्तव्य केलंय.

महाजन म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून ही योजना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच बंद झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र, जुन्या पेन्शनबाबत शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सकारात्मक असून लवकरच ही योजना लागू केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

'जुनी योजना रद्द करण्याचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचंच'

जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता करीत आहेत. मात्र, जुनी योजना रद्द करण्याचं पाप त्यांच्याच सरकारनं 2005 या वर्षी केलं होतं. माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वगळता राज्यात त्यांचंच सरकार होतं; परंतु आता चर्चा घडवून लबाडी करीत असल्याची टीका फडणवीसांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रश्नाबद्दल मी विधान परिषदेत सविस्तर उत्तर दिलं होतं, असं फडणवीस म्हणाले होते.