Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी या दंगली (Kolhapur Riots) घडवत आहेत.
NCP Leader Jayant Patil on Kolhapur Nashik Riots
NCP Leader Jayant Patil on Kolhapur Nashik Riotsesakal
Summary

कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते.

सांगली : राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी या दंगली (Kolhapur Riots) घडवत आहेत. त्या एकाच पॅटर्ननुसार होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

जिथे विरोधी पक्षाची ताकद अधिक आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. विरोधकांची ताकद दाबण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी वाढत्या गुन्ह्यांचा आढावा घेत कडक भूमिका घ्या, अशा सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडवून दंगली होत आहेत. खरं तर या दंगली घडवल्या जात आहेत, अशी शंका आहे.

NCP Leader Jayant Patil on Kolhapur Nashik Riots
Kolhapur Airport : CM शिंदेंच्या भेटीसाठी 'हा' माजी मंत्री विमानतळाबाहेर तासभर ताटकळत उभा राहिला!

राज्यात घडणाऱ्या दंगली एकाच पॅटर्ननुसार होत आहेत. ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद अधिक आहे, तिथे दंगली घडवल्या जात आहेत. कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची मांडणी अतिशय घट्ट आहे, अशा ठिकाणी दंगल होते, हे शंकास्पद आहे.

NCP Leader Jayant Patil on Kolhapur Nashik Riots
Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 'हे' 36 काँग्रेस नेते अडचणीत; कोर्टानं बजावलं समन्स

गृहमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवावी. विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. समाज माध्यमांतील फेक अकाउंटबाबत गांभीर्याने विचार करावा. वारकऱ्यांवर ३०० वर्षांत कधीही लाठीचार्ज झाला नव्हता. यापूर्वी ब्रिटिशांनी सुद्धा अशी वागणूक त्यांना दिली नव्हती. विठ्ठलभक्तीत लीन होऊन शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या संप्रदायाबाबत कधीही असा प्रकार झाला नव्हता. ही घटना निषेधार्ह आहे, असंही पाटील म्हणाले.

NCP Leader Jayant Patil on Kolhapur Nashik Riots
Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

‘मविआ’पुढे टिकाव लागणार नाही’

जयंत पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार करावा. मात्र, महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com