Darshan Solanki Case : दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांना सापडली नोट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darshan Solanki Case : दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांना सापडली नोट...

Darshan Solanki Case : दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांना सापडली नोट...

मुंबई : आयआयटी मुंबईतील बीटेक अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आलेला आहे. पोलिसांना या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

पवई आयआयटीत बी.टेक.च्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आत्महत्या केली होती. हा विद्यार्थी वसतिगृहात रहात होता. आयआयटी पवईच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने आयआयटी परिसरात खळबळ उडाली होती.

हेही वाचाः नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती. त्यानुसार आता याप्रकरणी एसआयटी चौकशी करीत आहे. पोलिसांना या प्रकरणात एक अपडेट मिळाली आहे.

मृत दर्शन सोलंकी याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये दर्शनला जातीवाचक टिपण्णी आणि धमकी दिल्याचं पुढे येत आहे. एका विद्यार्थ्यासोबत दर्शनने केलेलं व्हाट्सअप चॅट पोलिस तपासत आहेत.

कोण आहे दर्शन सोलंकी?

दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा होता. आयआयटी पवईत बी.टेक. मेकॅनिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. दर्शन घटनेपूर्वी तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी मुंबईतील आयआयटीत दाखल झाला होता. सुरुवातीला कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नव्हती. दर्शनने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही. आत्महत्येपूर्वी दर्शनची सहामाही परीक्षा संपली होती. त्यानंतर रविवारी दर्शनने टोकाचं पाऊल उचललं.