करवीर गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळ्यावर राजवाडा क्रांती झाली. विश्वासातील लोकांनी दगाबाजी केल्याने ताराबाई साताऱ्यात गेल्या. छत्रपतींचे अधिकार नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते.
कोल्हापूर : हिंदवी स्वराज्यरक्षिका, करवीर राज्य संस्थापिका ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ (Maharani Tarabai) चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज (ता. २४) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते होत आहे. न्यू पॅलेसच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. त्यानिमित्त ग्रंथाचे लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (Senior Historical Researcher Dr. Jaysingrao Pawar) यांच्याशी साधलेला संवाद...