सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

मुंबई - राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सुमारे ३५५ ठिकाणी झालेल्या धरणे आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, या आंदोलनात अडीच लाखांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज आहिर या मान्यवरांसह पक्षाचे खासदार, जिल्हा, तालुका, महानगर, शहर पातळीवरचे पदाधिकारी तसेच जि. प. अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि. प., पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पक्षाच्या सर्व आमदारांनी मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य जनतेनेही या आंदोलनाला प्रतिसाद देत महाआघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष प्रकट केला, असे पाटील यांनी सांगितले. या वेळी पाटील म्हणाले, की महाआघाडी सरकारने भाजप सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना रद्द केल्या आहेत. जनादेशाचा घात करत स्थापन झालेल्या या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा एक रुपयाचीही जादा मदत महाआघाडी सरकारने दिलेली नाही. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा निष्क्रिय आणि फसवाफसवी करणाऱ्या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com