मुंबई - ‘राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजप युती सरकारला त्याचे काही सोयर सुतक नाही. अदानी, अंबानींच्या फाइलवर सह्या करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर सही करायची वेळ आली की लकवा मारतो का?’’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.