Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikEsakal

शिवसेनाला धक्का देण्यासाठी भाजप सज्ज, महाडिकांना राज्यसभेची उमेदवारी

धनंजय महाडिक यांचेही नाव भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे.
Published on

मुंबई : धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचेही नाव भाजपकडून (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज रविवारी (ता.२९) जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता सहाव्या जागेसाठी चुरसीची लढाई पाहायला मिळणार आहे. भाजप व महाविकास आघाडीकडून जोर लावला जाईल. मतांचे गणित पाहिल्यास भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडी जर एकसंध राहिल्यास मित्र पक्षांचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. (BJP Announced Dhananjay Mahadik As Third Candidate For Rajya Sabha Election)

Dhananjay Mahadik
काँग्रेस मविआमध्ये राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला

कोल्हापुरात भाजपच्या विस्तारासाठी धनंजय महाडिकांची मदत होऊ शकते, याचा विचार करुन तिसरा उमेदवार म्हणून पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या अगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

Dhananjay Mahadik
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत

आज भाजपने राज्यसभेसाठी पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पक्षाने शिवसेनेला शह देण्यासाठी अचानक तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com