भाजपकडून खुुलासा : एकनाथ खडसेंचा राजीनामा, मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात मला माहिती नाही

राजेश दारव्हेकर
Wednesday, 21 October 2020

यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे योग्य पध्दतीने पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने पाठवावा सरकारला मदतीसाठी भाग पाडू असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळा बाजार येथे शेतकऱ्यांना बुधवार ता. २१ दिले.

हिंगोली : मागील अनेक दिवासंपासून तळ्यात- मळ्यात करणाऱ्या माजी महसुलमंत्री एकनाथ खडसेंनी अखेर आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला. अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी नुकतेच जाहीर केले. मात्र या प्रकरणाची कुठलीच माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाही. त्यांनी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, पक्षातील एक मोठा नेता राजीमान देतो ते मात्र विरोधी पक्षाला माहित नसणे याबाबत तर्क वितर्क काढल्या जात आहेत.

यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे योग्य पध्दतीने पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने पाठवावा सरकारला मदतीसाठी भाग पाडू असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळा बाजार येथे शेतकऱ्यांना बुधवार ता. २१ दिले.

यांची होती उपस्थिती 

जवळा बाजार येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी  श्री. फडणवीस येथे आले होते. यावेळी माजीमंत्री पंकजा मुंडे, निलग्याचे आमदार संभाजी पाटील निलगेकर, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री फडणवीस यांनी येथील शेतकरी प्रभाकर नागरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.

हेही वाचाहिंगोली : झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल अभियानात सामान्य प्रशासन विभाग अव्वल

 शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार तर फळबागेसाठी दिड लाख रुपये सरकारने

शेतकरी श्री. नागरे यांनी त्यांना यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. पिकासाठी केलेला खर्च देखील निघाला नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले. माझ्या सरकारच्या काळात पुर परिस्थिती व अतिवृष्टीने नुकसान झाल्यावर हेच उध्दव ठाकरे व अजित पवार शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार तर फळबागेसाठी दिड लाख रुपये सरकारने देण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार आहे त्यांनी किमान आमच्याकडे केलेली मागणी पुर्ण करावी असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी

तत्कालीन सरकारने दहा हजार कोटी शेतकऱ्यांला दिल्याची आठवण करून या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी आणि ती देण्यास भाग पाडू असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री पंकजा मुंडे, आमदार संभाजी पाटील निलगेकर यांनी वसमत तालुक्यातील आडगाव (रंजेबुवा) येथे देखील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर तसेच मिलिंद यंबल, सुरजित ठाकूर, सतीश सोमाणी, रावसाहेब अंभोरे, मुंजाजी ढोबळे, संजय नागरे, नागनाथ राखे, गेंदूअप्पा विभूते, गजानन नागरे, एकनाथ नागरे व शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर श्री फडणवीस हे औंढा तालुक्यातील माथा येथे मार्गस्थ झाले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announces: Eknath Khadse resigns, but Devendra Fadnavis says I don't know hingoli news