
Ashish Shelar : "आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे..."; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
Ashish Shelar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये मोठी सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला. या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेतेही याबद्दल प्रतिक्रिया देत आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंना असरानींची उपमा दिली आहे. तसंच शिवसेनेतल्या फुटीबद्दलही भाष्य केलं आहे. आधे इधर गए, आधे उधर गए, अकेले असरानी बच गए, असं शेलार म्हणाले आहेत.
आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही.
कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले "असरानी" बचगएं. आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..!"