esakal | निर्बंध उठवण्यासाठी ठाकरे सरकारचा 'वाटाघाटीचा' नवा धंदा - शेलार
sakal

बोलून बातमी शोधा

ashish shelar uddhav thackeray

निर्बंध उठवण्यासाठी ठाकरे सरकारचा 'वाटाघाटीचा' नवा धंदा - शेलार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

गोविंदा काय लादेन आहेत का?

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले "वाटघाटी" झाल्या, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांना सत्ताधारी महाविकास आघाडीवर केला आहे. शेलार म्हणाले की, 'वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे.'

थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटी करतोय. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशारा ही यावेळी शेलार यांनी दिला. त्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: ठरलं! 'ZP'साठी भाजपचा नवा प्लॅन; शेलार घेणार आढावा

काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसूली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल, असे शेलार म्हणाले.

loading image
go to top