esakal | ठरलं! 'ZP'साठी भाजपचा नवा प्लॅन; शेलार घेणार आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जिल्हानिहाय तयारी सुरू केली आहे.

ठरलं! 'ZP'साठी भाजपचा नवा प्लॅन; शेलार घेणार आढावा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती (Zilla Parishad and Panchayat Committee) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) जिल्हानिहाय तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांचे प्रमुख नेते आता जिल्ह्यात जाऊन तेथील तयारीचा आढावा घेत आहेत. त्यानुसार जिल्हा भाजपने बूथनिहाय रचना तयार करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये काही बूथप्रमुखांचे काम चांगले नाही, ते बदलण्यासह बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम आगामी तीन महिने केले जाणार आहे. त्यासाठीचा आढावा घेण्यासाठी आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) येत्या रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ठरविणार आहेत. (Local Body Election 2021 Booth Wise Structure Of BJP For Zilla Parishad And Panchayat Committee Election)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Local Body Election) सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. पण, सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीतही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) हवी आहे. तर भाजपने स्वबळावर पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजप व शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता. पण, मागील निवडणुकीत भाजपचे सात, तर शिवसेनेचे (ShivSena) दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेसच्या (Congress Party) बालेकिल्ल्यात प्रवेश केला आहे. आता त्यांचा सदस्यसंख्या वाढविण्याचा अजेंडा आहे. त्यासाठी भाजपचे दोन आमदार व दोन खासदारांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत ताकद निर्माण करण्याची तयारी भाजपची आहे. त्यानुसार भाजपने बूथनिहाय बांधणी सुरू केली आहे. यामध्ये बूथरचना करताना यापूर्वी सक्षम कार्यकर्त्यांना पुन्हा संधी देण्यासोबत ज्यांचे काम चांगले नाही, त्यांना बदलले जाणार आहे. यातून बूथ सक्षमीकरण करून आगामी निवडणुका सोप्या करण्यावर भर राहणार आहे.

हेही वाचा: माण बाजार समितीची निवडणूक रासप स्वबळावर लढणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार येत्या रविवारी (ता. ११) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात थांबून तेथील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही कानमंत्र देणार आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बूथबांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा: माण-खटावात काँग्रेसला ताकद देणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने बूथबांधणीवर भर दिला आहे. आम्ही या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर व स्वबळावर लढणार आहोत. येत्या रविवारी आमदार आशिष शेलार साताऱ्यात येऊन आगामी निवडणुकीसाठीची रणनीती सांगणार आहेत.

-विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

Local Body Election 2021 Booth Wise Structure Of BJP For Zilla Parishad And Panchayat Committee Election

loading image