
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सेना भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे.
सेना-भाजप वाद चिघळणार? बॅनरबाजीने भाजप करणार सेना नेत्याची पोलखोल
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा सेना भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपने बॅनरबाजी केली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांची पोल खोल करणार असल्याचे एक बॅनर भाजपाने लावले आहे. त्यामुळे आता या प्रकारावर शिवसेना काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग
यशवंत जाधव यांनी कोरोनाच्या काळात या इमारतीत ३८ घरे विकत घेतली आहेत. कोविड काळात जेव्हा मुंबईकर ऑक्सिजन आणि औषधाच्या अभावी प्राण गमवत होते, त्यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव एका मागे एक तब्बल ३८ घर घेण्यात व्यस्त होते. एवढ्या पैशांत अनेक मुंबईकरांचे प्राण वाचू शकले असते, अश्या आशयाचे बॅनर भाजपने यशवंत जाधव यांच्या घराबाहेर लावले आहे. भाजपाने पुन्हा एकदा यशवंत जाधव प्रकरणावरून शिवसेनेला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह कंत्राटदारांवर २५ फेब्रुवारीला छापे टाकले ( it raids shiv sena leader yashwant jadhav ) होते. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाला मोठी माहिती मिळाली आहे. जाधव यांची एक डायरी प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली होती. या डायरित कोट्यवधींच्या संशयित व्यवराहांची नोंद असल्याचं समोर आलं होतं. डायरित 'मातोश्री' ला ५० लाख रुपयांचे एक घड्याळ दिल्याची नोंद होती शिवाय गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची एक भेट दिली असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं.
हेही वाचा: समृद्धी महामार्गाचं उद्घाटन ढकललं पुढे, 'या' कारणामुळे तारीख बदलली
Web Title: Bjp Banner In Yashwant Jadhav House In Covid 19 Corruption Possibility Disputes Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..