किरीट सोमय्या तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

kirit somaiya
kirit somaiya

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. (Kirti Somaiya Leaves for Delhi to meet Home Secretary Ajay Bhalla)

मात्र, या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. (Kirit Somaiya Attacked in Mumbai)

याआधी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात कॉल झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा अमित शाहांनी घेतला.

kirit somaiya
माझ्यावरील हल्ल्यासाठी ठाकरे सरकारच स्पॉन्सर, सोमय्यांचा आरोप

भाजपच्या आमादारांचं शिष्टमंडळ गृहसचिवांना भेटायला चालल्याचं आमदार अमित साटम यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हे आमदारांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात दिल्लीती अधिकाऱ्यांशी सोमय्यांनी फोनवरून संपर्क साधला आहे. केंद्रात राजीवकुमार यांच्याशी कॉल झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनंतर भाजपने दिल्लीला जाण्याचा बेत आखल्याचं कळतंय.

kirit somaiya
शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला, झेड सुरक्षेतून दगड थेट गाडीत

शिशुपालाचे अपराध संपले - सोमय्या

सोमय्यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात ज्या प्रकारे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. त्याची सगळी माहिती मी गृहसचिवांना देणार आहे. राहूल नार्वेकर, अमित साटम, मिहिप पोटेचा, पराग शाह, विनोद मिश्रा हे भाजपच्या शिष्टमंडळात आहेत. माझा मनसुख हिरेन करणार असल्याच्या धमक्या मिळत आहेत. याची माहिती दिल्लीला देणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. दारात ७० गुंडं उभे होते. हे पोलिसांनी केलेलं षडयंत्र आहे. गाडी चालवणाऱ्या कमांडरवर तक्रार दाखल करून ठाकरेंनी हद्द केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com