मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक हालचाली वाढल्या आहेत. येत्या काळात भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महत्त्वाच्या महानगरांत स्वबळावर निवडणुकांसाठी चाचपणी सुरु झाली आहे.