PM Security : भाजपचा टिळक भवनावर मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation over PM Security Issue

PM Security : भाजपचा टिळक भवनावर मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा उड्डाण पुलावर अडकून पडला होता. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये गंभीर (PM Modi Security Breach) चूक होती, असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले असून आज भाजप (Mumbai BJP) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. तसेच त्यांनी टिळक भवनावर मोर्चा काढला.

हेही वाचा: पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर निर्माण झालेत पाच प्रश्न

मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी टिळक भवनावर मोर्चा काढला. मोर्चा येणार आहे, हे कळताच काँग्रेस कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच भाजप कार्यकर्यांना रोखल्यानं त्यांचा मोर्चा टिळक भवनापर्यंत पोहोचला नाही. पोलिसांनी फुल मार्केटच्या परिसरात कार्यकर्त्यांची धरपकड केली. आमदार कॅप्टन तामिल सेलवन यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक? -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा होती. त्यासाठी मोदी भटींडा विमानतळावरून रवाना झाले होते. ते तिथून हेलिकॉप्टरद्वारे हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला जाणार होते. २० मिनिटं वाट पाहून वातावरण ठीक झालं नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याने कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. पंजाब पोलिसांच्या महासंचालकांकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत दुजोरा मिळाल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला. कार्यक्रमस्थळापासून ३० किलोमीटर अंतरावर मोदींचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला असता काही आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखला. त्यामुळे मोदी १५-२० मिनिटं उड्डाण पुलावर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक होती. त्यामुळे त्यांना परत भटींडा विमानतळावर नेण्यात आले.'' असं गृहमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पण, काँग्रेसने आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच काही चूक झाली असेल तर चौकशीत पुढे येईल, असं पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून राज्यातील भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNarendra Modi
loading image
go to top