PM Modi Security Breach
PM Modi Security Breache sakal

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीनंतर निर्माण झालेत पाच प्रश्न

नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला आंदोलकांनी अडवल्यामुळे बुधवारी त्यांना २० मिनिटं एका पुलावर थांबून राहावं लागलं, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पंतप्रधांनाच्या ताफ्याला थांबून राहावं लागणं ही बाब सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक (PM Modi Security Breach) असल्याचं म्हटलं जातंय. तर भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी याला आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांना 'आपण भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो' मुख्यमंत्र्यांचे आभार माना असा संदेश देखील पोहोचवण्यास सांगितलं.

PM Modi Security Breach
Ferozepur Rally : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला न जाता थेट परत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या घटनेनंतर राजकारण तापलं आहे.

प्रश्न 1: रस्त्यासाठी ग्रीन सिग्नल कोणी दिला ?

गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी सकाळी भटिंडा विमानतळावर उतरले. ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर पोहोचणार होते. मात्र खराब हवामानामुळे पंतप्रधान 20 मिनिटं विमानतळावर थांबले. त्यानंतर रस्त्याने जायचं ठरलं. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी या मार्गाला ग्रीन सिग्नल दिला होता, त्यानंतरच पीएम मोदींचा ताफा रस्त्याने रवाना झाला. तर दुसरीकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की, पंतप्रधानांच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय यंत्रणांकडे असते. त्यामुळे ही केंद्रीय यंत्रणांच्या कामातील त्रुटी आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय.

प्रश्न 2 : जर ताफा अडकला असेल तर तो परिसर रिकामा का केला गेला नाही?

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींचा ताफा राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या 30 किमी आधी उड्डाणपुलावर अडकला. आंदोलकांनी रास्ता रोको केला. काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक पंतप्रधान मोदींचा ताफा अडवताना दिसत आहेत. म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या ताफ्यापासून सामान्य आंदोलक फार दूर नव्हते. तर या ताफ्यात काही लोकांच्या हातात भाजपचा ध्वज असल्याचंही महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिसून आलं.

प्रश्न 3: डीजीपी-मुख्य सचिव ताफ्यासोबत का नव्हते?

पंतप्रधान कोणत्याही राज्याच्या दौऱ्यावर गेले तर प्रोटोकॉलनुसार त्या राज्याचे डीजीपी आणि मुख्य सचिव त्यांच्या स्वागतासाठी जातात. मात्र इथे तसे झाले नाही. पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी डीजीपी किंवा मुख्य सचिव नव्हते. एवढेच नाही तर डीजीपी आणि मुख्य सचिवही पंतप्रधानांच्या ताफ्यासोबत राहतात. पण सूत्रांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात डीजीपी आणि मुख्य सचिवांची गाडी होती मात्र दोन्ही अधिकारी त्यात नव्हते.

प्रश्न 4 : पोलिसांनी आपत्कालीन मार्गासाठी काय तयारी केली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) जबाबदार आहे. मात्र, पंतप्रधान जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्या राज्यातील पोलिसांची जबाबदारीही वाढते. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की, पंजाब सरकारला पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची आधीच माहिती देण्यात आली होती. त्यांना रसद आणि सुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन नियोजनाची तयारी करावी लागते. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डीजीपी कार्यालयाकडून मार्ग मोकळा असल्याचा सिग्नल मिळाल्यानंतरच पीएम मोदींच्या ताफ्याने रस्त्याने प्रवास सुरू केला. मात्र, आंदोलकांनी रस्ता रोखला. त्यामुळे पंजाब पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रश्न 5 : आंदोलकांना पंतप्रधान रस्ते मार्गाने जाणार असल्याचं कसं कळलं?

वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार नव्हते. त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात अचानक बदल झाला. डीजीपी आणि मुख्य सचिवांसह राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाच पंतप्रधान मोदी रस्त्याने जाणार असल्याची माहिती होती. तरीही पंतप्रधान मोदी ज्या रस्त्यावरून जाणार होते तो रस्ता शेतकरी आंदोलकांनी अडवला. यामध्ये काही भाजपचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते देखील दिसून आल्याचा आरोप विरोधकांनी केला. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी मार्गावरून येत असल्याचं आंदोलकांना कसं कळलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आरोप केला आहे की, विरोधकांना पीएम मोदींच्या मार्गावर येऊ दिले.

दरम्यान, काँग्रेससह विरोधकांकडून असाही आरोप होतोय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी सभेला जाणार होते, तिथे फार कमी लोक उपस्थित होते. त्यामुळे हे सगळं ठरवून झाल्याचं देखील बोललं जातंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्याने जाणार होते, तो रस्त पाकिस्तानच्या सीमारेषेपासून फक्त १० किमी अंतरावर होता. त्यामुळे सीमा सुरक्षा दलांची देखील जबाबदारी होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील काही अंशी जबाबदारी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) जबाबदार आहे. मात्र पंतप्रधान जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्या राज्यातील पोलिसांची जबाबदारीही वाढते. गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे की, पंजाब सरकारला पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची आधीच माहिती देण्यात आली होती. त्यांना रसद आणि सुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन नियोजनाची तयारी करावी लागते. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डीजीपी कार्यालयाकडून मार्ग मोकळा असल्याचा सिग्नल मिळाल्यानंतरच पीएम मोदींच्या ताफ्याने रस्त्याने प्रवास सुरू केला. मात्र आंदोलकांनी रस्ता रोखला. त्यामुळे पंजाब पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com