पाचव्या जागेसाठी भाजपची धडपड, खडसेंना पाडण्यासाठी फिल्डिंग

मते फोडण्यासाठी शुक्रवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांसह नेत्यांनी काहीजणांसोबत छुप्या बैठका
BJP candidates in Legislative Council elections held secret meetings with some people Friday to break polls mumbai
BJP candidates in Legislative Council elections held secret meetings with some people Friday to break polls mumbai sakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पाठ सोडून भाजपकडे आलेल्या दहा आमदारांची मते पुन्हा साथ मिळाली तरी पाचव्या जागेसाठी नव्या मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. ही मते फोडण्यासाठी शुक्रवारी दिवसभर विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांसह नेत्यांनी काहीजणांसोबत छुप्या बैठका घेतल्या. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीपासून धडा घेतलेले महाविकास आघाडीतील घटकपक्षही सावध आहेत. निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांना एकूण ११३ मते मिळाली होती. विधान परिषदेसाठी प्रत्येकी २७ प्रमाणे भाजपच्या पाच उमेदवारांसाठी १३५ मते हवीत आहेत.

त्यासाठी पुन्हा फोडाफोडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत फुटलेली दहा मते पुन्हा भाजपला मिळतील, याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहेत. ‘ईडी’च्या ताब्यात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट होताच भाजप नेत्यांनी हा शुभसंकेत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

खडसे- रामराजेंना लाभ?

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपचा एक चमू काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहेत. खडसे यांना मानणारी तीन-चार मते भाजपकडे असल्याने ती वळविण्याचा प्रतिडाव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा आहे. त्याशिवाय, रामराजे नाईक बाळकर हेही भाजपमधील काही आमदारांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com