उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर राग काढावा पण... : चंद्रकांत पाटील

अशोक मुरुमकर
शुक्रवार, 19 जून 2020

विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजपमधील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्यात सतत काशावरुन तरी एकमेकांवर टीका सुरु असते. नुकत्याच एका मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात’, असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांना केला आहे.

सोलापूर : विधानसभा निवडणूक एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजपमधील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्यात सतत काशावरुन तरी एकमेकांवर टीका सुरु असते. नुकत्याच एका मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात’, असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांना केला आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत. त्यावर सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र कोरोनाला रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. परंतु आता लॉकडाऊनमध्ये काही शिथीलता आणून अपवाद वगळता अनेक व्यहवार सुरु केले आहेत. कोरोनावरुनावरुनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एका मुलाखतीत टीका केली आहे. याबाबतचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात? यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे घरातूनच कारभार पाहत असल्याची टिका करण्यात आली होती. विनोद तावडे यांनी म्हटलं होतं की, ‘राजेश टोपे वगळता इतर कोणतेही मंत्री फिल्डवर जाऊन काम करताना दिसत नाहीत.’ गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाहीत. शपथविधीसाठी मात्र कुटुंबासह घराबाहेर पडल्याचे पाहिले अशी टीका करण्यात आली होती. आता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसत नसल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्र्याच्या बाहेर फिरण्यावर झालेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे हे बाहेर पडत आहेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री या सगळ्या ठिकाणाहून ते काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा घराबाहेर न पडता काम करत आहेत. गृहमंत्री अमित शहासुद्धा कित्येक दिवसांत दिसलेले नाहीत. तुम्ही त्यांना हे प्रश्न का विचारत नाहीत? नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे 'वर्क फ्रॉम होम' करायचे, म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत, असं त्यावेळी म्हणाले होते.

शिवसेना व भाजप विधानसभा निवडणूक एकत्रीत लढले होते. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन त्यांची युती तुटली. आणि राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेनी एकत्र येऊन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या मुलाखतीत पाटील यांनी म्हटलंय की, राज्यातील कोरोनामुळे झालेला मृत्यूचा आकडा लपवला जात आहे. रुग्णालयांमधून शव गायब होत आहेत. पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. लोक उपयुक्त योजना रद्द करुन जनतेच्या विकासात अडथळा आणू नये.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Chandrakant Patil criticizes Chief Minister Uddhav Thackeray