
स्त्री कुणापेक्षाही कमी नाही, UPSC च्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये यावर्षी पहिल्या चार टॉपर्स या मुली आहेत. दरम्यान या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, असे म्हटले आहे. (bjp Chandrakant patil on four woman canditaes get on top in upsc exam result 2022)
या परीक्षेत प्रियंवदा म्हाडदळकर ही महाराष्ट्रातून पाहिली आली असून श्रुती शर्माने देशात पहिला क्रमांक तर, द्वितीय अंकिता अग्रवाल, तृतीय क्रमांकावर गामिनी सिंग आणि चौथा क्रमांक ऐश्वर्या वर्मा यांनी पटकावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत, या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत मुलींनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आहे, त्यांनी लिहिले की, "UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय." यासोबतच त्यांनी यशस्वी महिला उमेदवारांचे कौतुक करत, "लखलखतं यश मिळवलेल्या स्त्री शक्तीला सलाम. यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन!", असे म्हटले आहे.
हेही वाचा: राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? सुप्रिया सुळे म्हणाल्या..
दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ते चर्चेत आले होते. पाटील घरी जा आणि स्वयंपाक करा असे सुप्रिया सुळेंना म्हणाले होते, यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता तसेच महिला आयोगाकडून जबाब मागण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती.
हेही वाचा: राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Web Title: Bjp Chandrakant Patil On Four Woman Canditaes Get On Top In Upsc Exam Result 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..