esakal | 'शिवसेनेसारख्या विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

पुढील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवून सत्ता स्थापन करेल असेही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे

'शिवसेनेसारख्या विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही'

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना: भाजपसोबत युती करून मोदींजीच्या नावावर मते मागून भाजपचा विश्वास घात करून ५६ जागांवर शिवसेना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेला लगावला आहे. अशा विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही. पुढील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवून सत्ता स्थापन करेल असेही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारी (ता.चार) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, भाजपवर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू. गत विधानसभा निवणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून मोदीजींच्या नावावर मते मागितली. या निवणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत विश्वास घात केला. त्यामुळे ५६ जागा निवडून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. राष्ट्रवादीच्या ५४ जागा येऊन त्यांचा उपमुख्यमंत्री झाला. तसेच काँग्रेस ४४ जागावर महसूल मंत्री झाले, असा चिमटाही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी काढला.

हेही वाचा: पपईने शेतकऱ्यांच्या आयुष्यात ‘गोडवा’

दरम्यान पंढरपूर विधानसभा निवणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असतानाही भाजपने विजय मिळविल्याचे सर्वांनी पाहिले. भाजप पक्ष स्वतःच्या पायावर मजबूत होत चालला आहे. त्यामुळे भाजप पक्षाशी प्रामाणिक असलेल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवून जिंकू असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला.

loading image
go to top