समझने वालो को इशारा काफी है; शिंदेंच्या ट्वीटवर भाजपचे उत्तर

Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal

मुंबई : विधान परिषदेच्या मोठ्या विजयानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विजयासाठी मविआतील अस्वस्थ आमदारांची मदत झाल्याचे विधान करत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी राज्यसबेसाठी 2 जागा लढवा असा प्रस्तावही मविआकडून आला होता असे पाटील यांनी यावेळी सांगितले. पक्षातील मानहानीला कंटाळून आमदारांचे भाजपला मतदान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मविआतील नेत्यांना आपल्याच पक्षातील आमदारांवर विश्वास नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. परिषदेत मागात घेतो असे सांगूनही माघार घेतली नाही असे सांगत मविआतील आमदारांना सरकारबद्दल विश्वास नसल्याचे उघड या घटनेनंतर उघड झाले आहे. दरम्यान, शिंदे नॉट रिचेबल झाल्यापासून कुणाच्याही संपर्कात नव्हेत मात्र, काही वेळापूर्वी शिंदे यांनी एक ट्वीट केले. त्यावर पाटील यांना विचारले असता चंद्रकांत पाटी यांनी समझने वालो को इशारा काफी है! असे सूचक विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत तीन आणि कालच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार विजयी झाले. या विजयासाठी सदसदविवेक बुद्धीला स्मरून ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मानले. राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केले आणि विधान परिषदेला 134 आमदारांनी मदत केल्याचे पाटील म्हणाले. रात्री एक दोन वाजता तुम्ही हॉटेल बदलता असे म्हणत त्यांनी मविआला त्यांच्या आमदारांवर विश्वास नसल्याचा हल्लाबोल केला आहे. अडीच वर्षे पूर्वी अनेक आमदारांनी इशारा देत तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे असल्यास आम्ही तयार नसल्याचे म्हटले होते.

शिंदेची गटनेते पदावरून हकालपट्टी

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेसह साधारण 35 आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले असून, अजय चौधरी यांची गटनेते पदी वर्णी लावण्यात आली आहे. या निर्णयावर गटनेता बदलणे आणि नवीन निवडणे हा शिवसेनाचा अंतर्गत निर्णय असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शिंदेंचं ट्वीट काय

काही वेळापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे म्हटले होते. त्यांच्या या ट्वीट नंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, राज्यात सत्ता बदल होऊन मोठा भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत

एकनाथ शिंदे यांनी भाजपला सरकार स्थापनेचा प्रस्ताव पाठवला नाही किंवा भाजपने त्यांना कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे सध्या या घडामोडींवर काहीही बोलणं खूप घाईचे असून, आम्ही सध्या वाट पाहत आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com