esakal | हसन मुश्रीफ १९ महिने झोपले होते का? घोटाळ्याच्या आरोपावरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil mushrif

मुश्रीफ १९ महिने झोपले होते का? घोटाळ्याच्या आरोपावरून पाटलांचे उत्तर

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (minister hasan mushrif) यांनी पलटवार करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. भाजप सत्तेत असताना चंद्रकातं पाटील (chandrakant patil) यांनी घोटाळे केले आहेत. रस्ते घोटाळ्या प्रकरणी चंद्रकातदादा पाटील यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. त्याबाबतचे पुरवा देणार आहे. त्यावरूनच आता चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर टीका केली आहे.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही. माझं नाव हीच त्यांच्या झोपेसाठी गोळी असेल तर माझी काही हरकत नाही. किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा करणार आहेत, असे म्हटले. पण, ही त्यांची कार्यपद्धती आहे. ते असे दावा ठोकतच असतात. यावेळी ५०० कोटींचा दावा त्यांनी करावा. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यासाठी लोक वर्गणी काढून पैसे देणार आहेत का? हे पाहावे. त्यासाठी काळा पैसा लागत नाही. त्यासाठी पांढरा पौसाच लागतो. हे पांढरे पैसे मुश्रीफांकडे आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात ऐतिहासिक हॅम नावाचा प्रोजेक्ट आहे. तो मी आणला. ९ हजार कोटींचा प्रोजेक्ट मी आणला. त्याचे उद्घाटन हे सरकार फिरत आहे. माझ्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे सर्व पॅकेज उचलले गेले. आता त्या हॅममध्ये घोटाळा आहे? असे वाटत असेल तर त्यांना १९ महिन्यांनी जाग आली का. आतापर्यंत ते झोपा काढत होते का? १९ महिन्यांनी त्यांना साक्षात्कार झालाय. अशा प्रकारे त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल ते करू शकतात. मला काही अडचण नाही. मी धमक्यांना घाबरत नहाी. तुमची काही चूक नसेल तर तुम्ही घाबरचा कशाला? असेही पाटील म्हणाले.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, असे मुश्रीफांनी म्हटलेय. त्यावरही पाटलांनी भाष्य केले आहे. तुम्ही खूप खमके आहात. तुम्ही एकमेकांना फेविकॉल फेविकॉल लावले आहे. ते हलविण्याचा कोणाचा अधिकार नाही. कामाच्या वाटणीमध्ये आरोप करण्याचे काम किरीट सोमय्यांकडे दिले आहे. त्यामुळे पुढचे नाव कोणाचे आहे? हे तेच चांगल्याने सांगू शकतील.

loading image
go to top