
'भाजपनं आधीच बाजी मारलेली आहे...'; चित्रा वाघ यांचं ट्विट
राज्यात ओबीसी आरक्षणाकडे (OBC Reservation) सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, दरम्यान आज मध्य प्रदेशातील ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. त्रिस्तरीय टेस्टचं पालन होत नाही तोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात ओबीसी आरक्षणावरून चर्चेला सुरवात झाली आहे.
मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत, दोन आठवड्यात पंचायत निवडणुका घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आरक्षणाबाबतचा तोच निर्णय महाराष्ट्रात देखील लागू असणार आहे. या निर्णयावर भाजप(BJP) च्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या पक्षाची पाठ थोपटली आहे, त्यांनी ट्विट करत, मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असल्यामुळे तो महाराष्ट्रालाही लागू होईल असे सांगितले आहे, यासोबतच त्यांनी भाजप या निवडणूकांमध्ये २७ टक्के ओबीसींना तिकिटे देणार हे जाहीर केलं आहे, त्यामुळे भाजपने आधीच बाजी मारलेली आहे असे त्या म्हणाल्या आहेत.

भाजपची घोषणा..
ओबीसी आरक्षण लागू होईल किंवा नाही, पण भाजप २७ टक्के उमेदवारांना तिकीट देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. भाजपचा डीएनए ओबीसी (OBC Reservation) असून याच समाजाच्या जीवावर मोठा झालेला पक्ष आहे, असं ते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप या लढाईत पुढे गेल्याचे दिसत आहे. दरम्यान इतर पक्ष भाजपप्रमाणे काही निर्णय घेतील का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Web Title: Bjp Chitra Wagh On Supreme Court Decision Obc Reservation In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..