Wed, November 29, 2023

"काय नाना…तुम्ही पण झाडी डोंगार हाटेलात?" चित्रा वाघ यांच ट्विट
Published on : 20 July 2022, 12:02 pm
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक अक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला आहे. या तथाकथित व्हिडीओ मध्ये महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका महिलेसोबत बसलेले दिसत आहेत. दरम्यान या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये वाघ यांनी, "काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं…" असा टोला त्यांना लगावला आहे.
या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांना टॅग केले आहे. मात्र, हा व्हिडीओ कोणाचा आहे, तसेच कधीचा आहे याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मिडीयावर नाना पटोले यांचा व्हिडीओ म्हणून हा मोठ्या प्रणाणात व्हायरल होत आहे.