भाजपच्या घटकपक्षांची परवड; 'या' नेत्यांच्या आशेवर पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

भाजप-शिवसेना युती विधानसभा निवडणूक एकत्र लढली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर हे दोन पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला. यामुळे भाजपच्या घटकपक्षांची परवड झाली आहे.

मुंबई - सत्तास्थापनेच्या खेळात भाजपच्या घटकपक्षांची परवड झाली आहे. भाजपच्या घटकपक्षांचे महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाश महातेकर यांच्या आशेवर पाणी पडले आहे.

फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आली की बोलेन!

भाजप-शिवसेना युती विधानसभा निवडणूक एकत्र लढली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर हे दोन पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला. यामुळे भाजपच्या घटकपक्षांची परवड झाली आहे.

भाजपचे घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइं रामदास आठवले गटाचे अविनाश महातेकर हे मंत्री होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असते, तर या नेत्यांना मंत्रिपदाची आस लागली होती. माक्ष, तसे काही घडले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Component party Politics