फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आली की बोलेन!

वृत्तसंस्था
Wednesday, 27 November 2019

अजित पवारांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याने भाजपची कोंडी झाली अन् भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यावर प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की योग्य वेळ आली की मी यावर बोलेन.

मुंबई : महाराष्ट्रातल्या खळबळजनक सत्तानाट्यात काल (ता. 26) अखेर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडल्याने भाजपची कोंडी झाली अन् भाजपला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यावर प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की योग्य वेळ आली की मी यावर बोलेन.

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

आज (ता. 27) सर्व आमदारांचा विधानभवनात शपथविधी होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेऊन बाहेर येताना माध्यमांनी त्यांना घेरले व प्रश्न विचारला की अजित पवार ऐनवेळी का माघारी फिरले, यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर अजितदादांबद्दल बोलेन. इतकं बोलून फडणवीस तेथून निघून गेले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीसांनीही राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीचा एक गट आम्हाला पाठिंबा देण्यास तयार झाला होता, मात्र अजित पवारांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने आमचे बहुमत सिद्ध झाले नसते. असे सांगून त्यांनी राज्यापालांकडे राजीनामा सुपूर्द केला. 

आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं : संजय राऊत

अजित पवार सकाळी विधानभवनात शपथविधीसाठी आले असता, सुप्रिया सुळेंनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, मी कायम राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहीन. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर आज फडणवीस म्हणले आहेत की योग्य वेळ आली की बोलेन, त्यामुळे ते नक्की काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis speaks about Ajit Pawat that I will say the right thing at the right time