

Political Upset in BJP’s Stronghold Ward
Sakal
शर्मिला वाळुंज
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भाजपसाठी ‘सेफ’ मानल्या जाणाऱ्या प्रभागात अचानक राजकीय भूकंप झाला आहे. दोन टर्म भाजपचे लोकप्रतिनिधी राहिलेले शैलेश धात्रक यांनी भाजपकडून उमेदवारी नाकारली जाताच थेट मनसेचा हात धरत तीन एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. पत्नी मनिषा आणि मुलगी पूजा यांच्यासह अर्ज दाखल करताना धात्रक परिवाराची भावनिक अवस्था अनेकांसाठी अस्वस्थ करणारी ठरली. मात्र, या भावनिक चित्रामागे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची तीव्र धग स्पष्टपणे दिसून येते.