भाजपचं ठरलं! ...तरच विश्‍वासदर्शक ठराव मांडणार

गजेंद्र बडे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राज्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपचा विधानसभा अध्यक्ष निवडून आलाच तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत विश्‍वासदर्शक मांडणार आहेत. अन्यथा ठराव न मांडताच राजीनामा देणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सोमवारी (ता. 25) दिली आहे.

पुणे : राज्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपचा विधानसभा अध्यक्ष निवडून आलाच तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत विश्‍वासदर्शक मांडणार आहेत. अन्यथा ठराव न मांडताच राजीनामा देणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सोमवारी (ता. 25) दिली आहे. ही भाजपची भूमिका आहे. यानुसार भाजपचे पहिले लक्ष हे विश्‍वासदर्शक ठराव नसून, विधानसभा अध्यक्षांना निवडून आणणे असल्याचेही या नेत्याने सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरच सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे की, नाही हे निश्‍चित होत असते. कारण मुख्यमंत्र्यांना विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेले संख्याबळच अध्यक्ष निवडीसाठी हवे असते. त्यामुळे राज्यातील विद्यमान भाजप सरकारने याच फॉर्मुर्ल्याचा आधार घेण्याचे निश्‍चित केले आहे.

त्या आमदारांची वैयक्तिक जबाबदारी मी घेतो - शरद पवार

राज्य विधानसभेचे एकूण 288 सदस्य आहेत. यापैकी विधानसभा अध्यक्षांचा उमेदवार विजयी होण्यासाठी किमान 145 आमदारांचे मतदान अनिवार्य आहे. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठीही हाच आकडा आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीचे मतदान हे गुप्त पद्धतीने घेण्यात येते. त्यामुळे या मतदानासाठी महाविकास आघाडीतील किमान 30 आमदारांचे मतदान मिळविण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या असून त्यापैकी आतापर्यंत किमान 27 आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेलाही भाजपच्या गोटातून दुजोरा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP decided then only face floor test in maharashtra