त्या आमदारांची वैयक्तिक जबाबदारी मी घेतो - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

काही झालं तर त्या आमदारांची वैयक्तिक जबाबदारी माझी असेल, असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई : ज्या विधीमंडळ नेत्याचे निलंबन केले आहे त्याला आता विधिमंडळामध्ये कुठलाही अधिकार नाही आणि हे मी जबाबदारीने सांगतो. तसं काही झालं तर त्या आमदारांची वैयक्तिक जबाबदारी माझी असेल, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. महाविकासआघाडीच्या 162 आमदारांना संबोधित करताना ते बोलत होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...

राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. पवार म्हणाले, 'आमदारांना सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, असं सांगत आमदारांना त्यांनी शब्द दिला.

मी पुन्हा येईन म्हणणार नाही, कारण आम्ही आलेलो आहोत : उद्धव ठाकरे

पवार पुढे म्हणाले, 'नवीन आमदारांनी निश्चिंत राहा. तसेच, बहुमत नसताना त्यांनी चुकीच्या रितीने सत्तास्थापन केली. आमदारांना भीती दाखवली जातेय. गोवा, मणिपूर येथे झालं ते महाराष्ट्रात शक्य नाही, महाराष्ट्र अशा गोष्टी खपवून घेणार नाही, संसदीय लोकशाहीची हत्या होणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईन'.

भाजपला बसणार मोठा झटका; अजित पवार द्विधा मनस्थितीत?

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी तातडीने पाचारण करण्यात यावे, या मागणीनंतर सर्व पक्षांचे जेष्ठ नेते व १६२ आमदार आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र जमले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar address 162 MLA of Mahavikas Aghadi at grand hyatt hotel