esakal | राज्यात भाजप स्वबळावर लढणार : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant-Patil

राज्यात आगामी निवडणुकांत महाआघाडी सरकार एकत्रित लढले तरी काही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आणि इच्छादेखील आहे, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात आघाडी सरकारला मोठे अपयश आल्याचा आरोप केला.

राज्यात भाजप स्वबळावर लढणार : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
उमेश घोंगडे

पुणे - राज्यात आगामी निवडणुकांत महाआघाडी सरकार एकत्रित लढले तरी काही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आणि इच्छादेखील आहे, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि मराठा आरक्षणाचा विषय हाताळण्यात आघाडी सरकारला मोठे अपयश आल्याचा आरोप केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटील म्हणाले, या सरकारमध्ये समन्वय नाही. त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयातील निकालावर झाला. परिणामी त्याचा फटका राज्यातील लाखो मराठा तरुणांना सहन करावा लागत आहे. शिक्षण आणि नोकरीच्या अनेक संधी मराठा तरुणांच्या हातातून जात आहेत. किमान आरक्षणाच्या विषयात तरी आघाडीतील तिन्ही पक्षांनी समन्वय ठेवला असता तर मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अबाधित राहिले असते. 

अंतिम वर्षाची 5 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान परीक्षा ! महाविद्यालये अन्‌ पुढील परीक्षा "या' दिवशी होणार सुरू 

सरकारमधील मंत्र्यांचा परस्परांशी समन्वय नाही. त्यामुळे न्यायालयात भूमिका मांडताना गोंधळ झाला. त्यातून आरक्षण स्थगितीपर्यंतचा निर्णय झाला. भाजप सरकारच्या काळात आरक्षणाचा विषय पक्ष आणि सरकारच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय होता. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यात कोणतीही कसूर केली नाही. त्याचा फायदा झाला उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.यामागे कायद्याचा अभ्यास करून प्रयत्नपूर्वक केलेले काम होते. मात्र. आम्ही कष्टाने मिळविलेले आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. आरक्षणासाठी मराठा समाजाचे आता सुरू असलेले आंदोलन स्वयंस्फूर्त आहे. त्याला आमची फूस असल्याचा सरकारचा आरोप चुकीचा असून सरकार सर्वोच्च न्यायालयात आलेले अपयश आमच्यावर आरोप करून झाकू शकत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमचे मार्गदर्शक आहेत. आमच्यासाठी ते पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. आपण पक्ष सोडून जाणार नाही, असे खडसे यांनीच स्पष्ट केले आहे. 

मात्र, त्यांची काही नाराजी असेल तर टीव्हीच्या माध्यमातून न मांडता पक्षातील वरिष्ठांकडे मांडावी, असा माझा त्यांना सल्ला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्याकडेही काही जबाबदारी येणार आहेत.

मेधा कुलकर्णींची भेट मतदारसंघातील कामासाठी 
मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट मतदारसंघातील कामासाठी होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी संदर्भातील चर्चेला काहीही अर्थ नाही. त्या रामदास आठवले यांनाही भेटल्या याचा अर्थ त्या "आरपीआय''मध्ये जाणार आहेत का? असा प्रश्‍न त्यांनी केला.

Edited By - Prashant Patil

loading image