...तर राज्यातील भाजपचे सरकार कोसळेल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जळगाव - राज्यातील फडणवीस सरकार, पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी धान्याऐवजी सबसिडी देण्याची योजना बंद करावी, धान्यच द्यावे. राज्यातील सत्ता टिकवायची असेल, तर राज्य सरकारने धान्याऐवजी सबसिडी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मतदार त्यांना आगामी निवडणुकीत खाली खेचतील, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी आज येथे दिला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ (पुणे) यांच्या आवाहनानुसार विविध मागण्यांसाठी रेशन कार्डधारक आणि रेशन दुकानदारांचा महामोर्चा काढण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. 

मोदी म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने धान्याऐवजी पैसे देण्याची योजना सुरू केल्यामुळे कुटुंबातील महिलांना धान्य घेता येणार नाही. कारण अनेक पुरुष या पैशांचा वापर नको त्या ठिकाणी करतील. गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही. कुपोषण व अराजकता वाढेल. महाराष्ट्रातील कोट्यवधी कुटुंबांचा हा प्रश्‍न आहे. त्यांना धान्य मिळाले नाही, तर ते काहीही करू शकतात. 

झारखंड, उत्तराखंडमध्येही धान्याऐवजी सबसिडी देणे लागू केले. तेथे नागरिकांचा विरोध होताच तेथील सरकारने तो निर्णय मागे घेतला. मग महाराष्ट्रात हे का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. 

या शासनाला स्वतःच्या यंत्रणेवरच भरवसा नाही. यामुळे त्यांनी धान्याऐवजी सबसिडीची योजना लागू केली. रेशन दुकानदार व कार्डधारकांच्या अडचणी मला माहीत आहेत. न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मात्र, तुम्हा सर्वांनी माझ्या सोबत राहिले पाहिजे. 
- प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर फेडरेशन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government will collapse in the state says pralhad modi