...त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय - पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
...त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय - पवार

...त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय - पवार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या वेगवेळ्या पक्षांच्या नेत्यांवर सध्या कारवाईचं सत्र सूरू आहे. ईडी आणि सीबीआयच्या मार्फत राज्यसरकारमधील काही नेत्यांची चौकशी सुरू असून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. यावरूनच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजवर टीका केली.

महाराष्ट्रासारखं राज्य भाजपच्या हातातून गेल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्व मोठा परिणाम झाला असून, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, विरोधपक्ष रोज सरकार पडणार असल्याचं सांगत होतं. मात्र तसं झालं नसून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारने २ वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. मात्र सरकार पडत नसल्याने ते अस्वस्थ झाले असून, दुसऱ्या मार्गाने राज्याला अडचणीत आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे नेत्यांच्या चौकशा लावणे, सरकारला अडचणीत आणणे अशा लोकशाही विरोधी मार्गांचा ते अवलंब करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

हेही वाचा: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण - शरद पवार

महाविकास आघाडी सरकारच्या वेगवेळ्या नेत्यांवर चौकशा लावल्या जाता आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील लोकांवर खोटे आरोप केले जाता आहेत, तसं या तीन्ही पक्षांचं नातं घट्ट होतं आहे असंही ते पुढे म्हणाले.

loading image
go to top