
उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप
पुणे : मुख्यमंत्री ठाकरे कुणाकुणाचे पार्टनर आहेत? असा सवाल भाजपाचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहेत असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
(Kirit Somaiya On CM Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावरही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले असून पाटणकरांचे विमल अग्रवाल यांच्याशी संबंध आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची १००० कोटी ची जागा असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला.
हेही वाचा: किती दिवस अधांतरी ठेवायचं? काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चव्हाणांचा सवाल
"नवाब मलिक चे संबंध दाऊदशी आहेत तर ठाकरे यांच्या पार्टनर चे संबंध कसाब पर्यंत आहेत. उद्धव, रश्मी, आदित्य, तेजस आणि त्यांचा मामा हे पार्टनर तरी नेमकं कुणाकुणाचे आहेत?" असा सवाल त्यांनी केला आहे. हेमंत करकरे यांची हत्या कसाबने केली पण त्यांचं जॅकेट हे बुलेटप्रुफ होतं. मग हे जॅकेट नकली होतं आणि ते दिलं होतं विमल अग्रवाल यांनी. असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कसाबशी कसे संबंध आहेत ते सांगितले.
यशवंत जाधव आणि विमल अगरवाल यांची एक कंपनी आहे आणि यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांची १००० कोटीची जागा आहे मग ठाकरे परिवार आणि यशवंत जाधव यांचे कसे संबंध आहेत असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटींचे मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा: Petrol-Diesel Rate: तेल कंपन्यांकडून दिलासा; जाणून घ्या आजचे नवे दर
हसन मुश्रीफ यांनी १६ कोटी रुपये शेतकऱ्यांकडून जमा केले आहेत आणि कारखाना सुरू केला असून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. तसेच अनिल परबांचंही उलटं काऊंटडाऊन सुरू झालं आहे असं ते म्हणाले. परबांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं होतं पण ते पाडलं नाही, त्यावर आता कोर्टाचा आदेश येईल आणि कारवाई होईल असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
Web Title: Bjp Kirit Somaiya On Cm Uddhav Thackeray Kasab Connection
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..