किती दिवस अधांतरी ठेवायचं? काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चव्हाणांचा सवाल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळ माध्यमासोबत गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते.
Former CM Prithviraj Chavan
Former CM Prithviraj ChavanSakal

पुणे : सध्या राज्यात चाललेल्या राजकारणावर खास गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी सकाळच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलासपणे विविध विषयावर गप्पा मारल्या. सध्या काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत पडझडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी महाविकास आघाडीसोबतचं नातं, चिंतन शिबीर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यावर चर्चा केली आहे.

(Former CM Prithviraj Chavan Exclusive Interview)

देशातील पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जबर फटका बसला आहे. पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकांत एकाही राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. या चिंतन शिबिराच्या वेळी कोणत्याही प्रकारचे चिंतन झाले नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Former CM Prithviraj Chavan
कोकण, विदर्भात पुढच्या 3 दिवसांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने जात आहे हे कळत नाही. सध्या राहुल गांधी यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे पण सध्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष कुणीची नाही असं ते म्हणाले. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा यासाठी आम्ही कोरोना काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात आम्ही काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवाय अशी मागणी केली होती.

शक्य झालं तर आपण निवडणुका घेऊ असंही आम्ही म्हटलं होतं. त्यानंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या सहित आमच्या १९ जणांची मिटिंग या पत्राच्या संदर्भात झाली होती. आमच्या मनात काय होतं, काय चिंता आहेत हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यानंतर त्या म्हणाल्या की आपण चिंतन शिबीर घेऊ आणि पक्षाच्या निवडणुका घेऊ. त्यामुळे तेव्हा आमचं समाधान झालं होतं.

Former CM Prithviraj Chavan
औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर; आठवड्यातून फक्त 45 मिनिटं पाणीपुरवठा

त्यानंतर त्यांना पक्षासाठी राहुल गांधी योग्य नाहीत असं तुम्हाला वाटतंय का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ते म्हणाले की. "तसं नाही, राहुल गांधी खूप मोठं नेतृत्व आहे. आम्हाला कोण पाहिजे ते आम्ही ठरवू पण ते तयार नसल्यावर काय करायचं? असं किती दिवस पक्षाचं अध्यक्षपद अधांतरी ठेवायचं? राहुल गांधी काहीच सांगत नाहीत, त्यामुळं निवडणुका व्हाव्यात असं आम्हाला वाटतं.

कारण पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे एक जबाबदारी असते, अध्यक्षामुळे पक्षाला दिशा मिळते. फक्त निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हाव्यात अशी आमची मागणी होती. त्यानंतर अध्यक्ष कुणीही झालं तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुकानंतर प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी मिळाली तर काम करता येतात." असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत पाहण्यासाठी सकाळ माध्यमाच्या युट्यूब चॅनलला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com